26 जानेवारी : प्रजासत्ताक दिन
26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन (Prajasattak Din/ 26 January Republic Day):
आज आपण सर्वजण आपल्या भारत देशाचा 71 वा प्रजासत्ताक दिन साजरा करतो आहोत. आपणा सगळयांकरता हा शुभदिन एक आनंद पर्वणी असते. महाविद्यालयं, शाळा, शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसोबतच संपुर्ण देशभर आजचा हा दिवस साजरा होत असतो.
स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या दोन दिवसांमधला फरक विचारला तर सांगता येत नाही. भारताचे नागरिक म्हणून प्रत्येकाला प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो, हे माहित असायला हवे.
भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. त्यामुळे हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. मात्र 1930 साली 26 जानेवारीला लाहोर येथे काँग्रेसचे जे अधिवेशन झाले, त्यातच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. याच अधिवेशनात तिरंगा ध्वजही फडकावण्यात आला. या दिवसाची आठवण म्हणून याच दिवशी राज्यघटना अंमलात आणण्याचे निश्चित करण्यात आले.
संविधान समितीने भारताचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी स्विकृत केले आणि पुढे 1950 साली 26 जानेवारी या दिवशी पासुन भारतीय संविधानाला अमलांत आणण्यात आले.
भारताच्या संविधानाला संविधान समितीव्दारे तयार करण्यात आले होते. हे संविधान तयार करण्याकरीता तब्बल 2 वर्ष, 11 महीने 18 दिवसाचा कालावधी लागला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली संविधानाचा मसुदा तयार करण्याकरीता 29 ऑगस्ट 1947 या दिवशी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली होती.
भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 या दिवशी मिळाले. परंतु 26 जानेवारी 1950 ला आपला देश संविधान स्विकृत केल्यानंतर एक लोकतांत्रिक, सार्वभौमिक आणि गणराज्य बनला.
Post a Comment