वाचनानेच माणूस समृद्ध होतो : डॉ. धनराज माने
वाचनानेच माणूस समृद्ध होतो : डॉ. धनराज माने
सांगली | दि.१२/८/२०१८
भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात ग्रंथालयशास्त्राचे जनक पद्मश्री डॉ.एस.आर. रंगनाथन यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी डॉ.एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणेचे मा. डॉ. धनराज माने व कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे मा. डॉ.व्ही.डी. नांदवडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
माणसाने समृद्ध होण्यासाठी व जीवनात उच्च ध्येयप्राप्तीसाठी वाचनच गरजेचे असते असे प्रतिपादन डॉ. धनराज माने यांनी केले. तसेच डॉ.एस.आर. रंगनाथन यांच्या कार्याचा आढावा घेणारे भित्तीपत्रक व पोष्टर प्रदर्शन याचे उदघाटन मुंबईचे शिक्षण तज्ज्ञ मा. डॉ.आनंद मापुसकर, सांगली जिल्हा प्राचार्य संघटना सांगलीचे अध्यक्ष व या महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. डी.जी. कणसे, सांगली जिल्हा प्राचार्य संघटना सांगलीचे सचिव मा. डॉ.एस.आर. पाटील यांचे हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व डॉ. रंगनाथन यांच्या कार्याचा आढावा ग्रंथपाल प्रा. जयश्री हाटकर यांनी घेतला. यावेळी मान्यवरांनी ग्रंथालये व वाचन संस्कृती या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास सांगली जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, महाविद्यालयातील प्राध्यापक, सेवक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.
Post a Comment