विद्यापीठ, महाविद्यालयांतील कार्यक्रमांची सुरवात राष्ट्रगीताने : उदय सामंत यांची घोषणा
विद्यापीठ, महाविद्यालयांतील कार्यक्रमांची सुरवात राष्ट्रगीताने : उदय सामंत यांची घोषणा
राज्यातील सर्व बिगर कृषी
विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये यापुढे कोणत्याही कार्यक्रमाची सुरवात ही
राष्ट्रगीताने (National anthem) करण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
यांनी गुरुवारी दिली. कोणत्याही कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रगीताने करण्यासंदर्भातील
शासकीय आदेश येत्या एकदोन दिवसांत काढला जाईल, असेही सामंत यांनी सांगितले.
महाविद्यालयांत मराठीची
सक्ती:
आपल्या मातृभाषेचा अभिमान
हा राज्याने जपला पाहिजे. त्यासाठी राज्यातील सर्व महाविद्यालयांच्या नावाचे फलक
हे मराठीतच लावले जावेत, असे आदेश जरी करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व
तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. मराठीतून नामफलक लावले नाहीत तर
महाविद्यालयांची मान्यता रद्द केली जाईल, असेही सामंत यांनी सांगितले आहे.
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे
जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या तैलचित्राचे अनावरण एलफिस्टन
महाविद्यालयाच्या ग्रंथालयात उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळेस ते बोलत
होते.
Post a Comment