मकरसंक्रात
मकर ही एक रास असून सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांती असे म्हटले जाते. तर मकर संक्रांतीच्या दिवशीच सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून याला मकर संक्रांती म्हणतात. मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे. सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे. भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. बायका उखाणे घेतात. हा सण जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो.
भौगोलिक संदर्भ :
हिंदु संस्कृतीतील हा एकमेव असा सण आहे जो त्याच तारखेला येतो. याचे कारण म्हणजे तो सूर्याच्या (सूर्याच्या स्थानावर) कॅलेंडरनुसार बाकी सर्व सण हे चंद्र कॅलेंडरवर (चंद्राच्या स्थानावर) आधारलेले असतात.
दरवर्षी २१-२२ डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीच्या साडेतेवीस दक्षिण या अक्षांशावर लंबरूपात पडतात आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. इसवीसनाच्या सुरुवातीच्या वर्षांत सूर्य त्याच सुमारास मकर राशीमध्ये संक्रमण (प्रवेश) करीत असे, त्यामुळे साडेतेवीस दक्षिण या अक्षवृत्ताला मकरवृत्त म्हणू लागले. पुढच्या काळात सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात २१-२२ डिसेंबरलाच होत राहिली, तरी पृथ्वीच्या परांचन गतीमुळे सूर्याच्या मकरसंकमणाची तारीख पुढेपुढे जात राहिली. साहजिकच हिंदूंच्या मकरसंक्रांत या सणाची तारीख बदलत राहिली.
मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. सूर्याचे उत्तरायण आधीच म्हणजे २१-२२ डिसेंबरलाच सुरू झालेले असते. अर्थातच त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूच असते. पृथ्वीवरून पाहिले असता, २१-२२ डिसेंबरपासून सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते.
मकरसंक्रांतीच्या बदलत गेलेल्या तारखा:
इंग्लिश महिन्यानुसार हा दिवस बहुधा १४ जानेवारी रोजी येतो. परंतु दर काही वर्षांनी ही इंग्रजी तारीख एकएक दिवस पुढे जाते. उदा०
इ.स.१६००: ९ जानेवारी (पौष कृष्ण अष्टमी शके १५२१)
इ.स.१७००: १० जानेवारी (प़ौष कृष्ण षष्ठी शके १६२१)
इ.स.१८००: ११ जानेवारी (पौष पौर्णिमा शके १७२१)
इ.स.१८५०: १२ जानेवारी (पौष कृष्ण चतुर्दशी शके १७७१)
सन १९०० ते २१०० या वर्षांतील मकरसंक्रांतीच्या तारखा अश्या होत्या किंवा असणार आहेत :
१३ जानेवारी : सन १९००,१९०२, १९०५, १९०९, १९१३, १९१७, १९२१, १९२५ आणि १९२९.
१५ जानेवारी : सन १९७२, १९७६, १९८०, १९८४, १९८८, १९९२, १९९६, २०००, २००४, २००८,
२०११-१२,
२०१५-१६,
२०१९-२०,
२०२३-२४,
२०२७-२८,
२०३१-३२,
२०३५-३६,
२०३९-४०,
२०४३-४४,
२०४७-४८,
२०५०-५१-५२,
२०५४-५५-५६,
२०५८-५९-६०,
२०६२-६३-६४,
२०६६-६७-६८,
२०७०-७१-७२,
२०७४-७५-७६,
२०७८-७९-८०,
२०८२-८३-८४ आणि २०८६ ते २१००.
१४ जानेवारी : सन १९०० ते सन २१०० या २०१ वर्षांच्या कालावधीतील ज्यांचा उल्लेख वर आला नाही अशी सर्व वर्षे.
१६ जानेवारी २१५० (पौष कृष्ण तृतीया शके २०७१)
१७ जानेवारी २२०० (पौष शुक्ल प्रतिपदा शके २१२१)
१८ जानेवारी २२५० (पौष शुक्ल चतुर्दशी शके २१७१)
१९ जानेवारी २३०० (पौष कृष्ण त्रयोदशी शके २२२१)
२० जानेवारी २४०० (पौष कृष्ण नवमी शके २३२१)
२१ जानेवारी २५०० (पौष कृष्ण पंचमी शके २४२१)
२२ जानेवारी २५५० (पौष शुक्ल तृतीया शके २४७१)
२३ जानेवारी २६०० (पौष कृष्ण द्वितीया शके २५२१)
प्राचीन ग्रंथातील उत्तरायण महत्त्व :
महाभारतात कुरु वंशाचे संरक्षक भीष्म हे बाणांच्या शय्येवर (शरशय्येवर) उत्तरायणाची वाट पहात पडून होते. त्यांना इच्छामरणाचे वरदान होते. ज्या दिवशी उत्तरायण सुरू झाले त्यादिवशी त्यांनी प्राणत्याग केला. भारतीय परंपरेत उत्तरायणाचा काळ दक्षिणायनापेक्षा अधिक शुभ मानला जातो.
समजुती :
संक्रांत ही एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते अशी समजूत प्रचलित आहे. मात्र यामागे नेमका काय कार्यकारणभाव आहे हे मात्र नोंदविलेले दिसून येत नाही.
तीळ आणि गूळ यांचे महत्व:
तीळ आणि गूळ यांचे लाडू किंवा वड्या करण्याची पद्धत आहे. यामागे भूतकाळात झालेल्या कडू आठवणींना विसरून त्यात तीळ आणि गूळ यांचा गोडवा भरायचा असे म्हटले जाते. पण या गोष्टीलाही वैत्रानिक दृष्टीकोन आहे. तीळ हे उष्ण आणि स्निग्ध असतात. थंडीत शरीराला उष्णता आणि स्निग्धतेची आवश्यकता असते. तसेच गुळातही उष्णता असल्याने या पदार्थांचे महत्त्व आहे.
प्रादेशिक विविधता :
संक्रात भारताच्या विविध प्रांतांत उत्साहाने साजरी केली जाते.
उतर भारत :
हिमाचल प्रदेश - लोहडी अथवा लोहळी, (Lohri)
पंजाब - लोहडी अथवा लोहळी, (Lohri)पंजाब , हरियाणा या भागात १३ जानेवारी या दिवशी लोहारी सण साजरा केला जातो.संध्याकाळच्या शेकोटीसाठी छोटी मुले घरोघरी जाऊन गाणी म्हणतात व शेकोटीसाठी लाकडे वा पैसे गोळा करतात. शेकोटी पेटल्यावर त्यात उसाचे पेर, तांदूळ, तीळ टाकतात. हिवाळ्यातील हा सर्वात थंड दिवसांपैकी एक असतो. या दिवशी लोहरीदेवीची पूजा करतात.
पूर्व भारत :
बिहार - संक्रान्तिआसाम - भोगाली बिहू, (Bhogali Bihu)पश्चिम बंगाल - मकर संक्रान्तिओरिसा - मकर संक्रान्ति
पश्चिम भारत :
गुजरात व राजस्थान - या दिवशी घरोघरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पतंग उडवतात. हा पतंगोत्सव पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक गुजराथला भेट देतात. या सणाला गुजरात आणि राजस्थान राज्यांमध्ये पतंगाचा सण म्हणून ओळखले जाते. यामागे करमणूक होणे हा उद्देश असला तरीही शास्त्रीय कारणही आहे. पतंग सकाळी सकाळी उठून उडवल्याने शरीराला ऊन लागून भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन D मिळते. याने थंड हवे पासून होणाऱ्या समस्या पासून दूर होण्यास मदत होते.
दक्षिण भारत :
कर्नाटक, आंध्र प्रदेश - (संक्रांति)
तमिळनाडू - पोंगल, (Pongal)दक्षिण भारतात पोंगल सण ३ दिवस साजरा होतो. भोगी पोंगल या दिवशी होळी पेटवून त्यात घरातील अनावश्यक वस्तू टाकतात. मुली त्या होळीभोवती फेर धरून नाचतात. सूर्य पोंगल या दिवशी तांदूळ, गूळ, दूध यांची खीर करून तिचा नैवेद्य दाखवितात. मुडू किंवा कननु पोंगल या दिवशी गोठ्यातील जनावरांची पूजा केली जाते. याच दिवशी भावाच्या चांगल्या आयुष्यासाठी बहिणी पूजा करतात व भावाला ओवाळतात.
शबरीमला मंदिरात मकर वल्लाकु उत्सव.
भारताबाहेरील देशात :
नेपाळमध्ये, थारू (Tharu)
थायलंड - सोंग्क्रान (Songkran)
लाओस - पि मा लाओ (Pi Ma Lao)
म्यानमार - थिंगयान (Thingyan)
Post a Comment