स्वामी विवेकानंद : एक युगपुरुष
स्वामी विवेकानंद : एक युगपुरुष
युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद एक युगपुरुष आणि महान योगी होते. बालपणापासूनच विवेकानंद म्हणजेच नरेंद्रनाथ यांना ध्यान करायला आवडे. ते ध्यानाला बसले की तासनतास ध्यान करत. त्यांना सतत प्रश्न पडत. पुढे जाऊन ईश्वर आहे का असा प्रश्न त्यांनी गुरु रामकृष्ण परमहंस यांना केला होतं. स्वामी विवेकानंद यांनी मन आणि मनाची शक्ती या विषयाचे चिंतन केले होते.
बाळाचे पाय पाळन्यात दिसतात हे म्हणतात ते काही खोट नाही. हीच उक्ति अगदी जश्याच तशी लागु पडते ती भारतात जन्म घेतलेल्या अशाच एका महान युगपुरुषासाठी. ज्यांनी आपल्या छोट्याश्या कारकिर्दीत आपल्या कर्तुत्वाने प्रसिद्धि मिळविली, त्यांचे हे कार्य फक्त भारतातच नव्हे तर विदेशात देखील नावजल गेल. विदेशात देखील ज्यांच्या ज्ञानाने लोकांना मंत्रमुग्ध करून सोडलं असे महापुरुष होते स्वामी विवेकानंद. 19 व्या शतकातील भारतीय विद्वान रामकृष्ण परमहंस यांचे ते शिष्य होते. भारतीय संस्कृती आणि येथील शिकवण ही विदेशात पोहोचविण्यासाठी या महापुरुषाने योगदान दिलं. संपूर्ण विश्वात हिंदू धर्माचे स्थान निर्माण करून त्याचे महत्व टिकवून ठेवण्यात विवेकानंदांचा मोठा वाटा आहे.
स्वामी विवेकानंदांचा जन्म कलकत्ता मध्ये 12 जानेवारी 1863 ला झाला. विवेकानंदांचे वडील विश्वनाथ दत्त आणि आई भुवनेश्वरी देवी या माता पित्यांनी आपल्या सुंदर शिकवणुकीने विवेकानंदांना घडविले. विवेकानंदांचा जन्म एका पारंपारिक बंगाली कुटुंबामध्ये झाला. विवेकानंदांचे वडील कोलकात्यातील उच्च न्यायालयात atoni at law करत असत तसेच ते कोलकात्यातील उच्च न्यायालयात वकीली देखील करत होते. विवेकानंद हे एक विचारक, अति उदार, गरिबांविषयी सहानुभूती असलेले धार्मिक आणि सामाजिक विषयामध्ये व्यावहारिक आणि रचनात्मक दृष्टिकोन ठेवणारे व्यक्ती होते.
विवेकानंदांबद्दल जेव्हादेखील काही बोललं जातं तेव्हा अमेरिकेतील शिकागोमध्ये धर्मसंसदेमध्ये 1893 ला विवेकानंदाने दिलेल्या भाषणाची चर्चा नेहमी केली जाते. 16 ऑगस्ट 1886 मध्ये रामकृष्ण परमहंस यांचं निधन झाल्यावर शिकागो परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केलं. याप्रसंगी स्वामी विवेकांनंदांचे विचार ऐकून सर्व जमा झालेले विद्वान चकित झाले होते. स्वामी विवेकानंद यांनी गोरगरिबांच्या कल्याणासाठी रामकृष्ण मिशन ची स्थापना केली. त्याचबरोबर ठिकठिकाणी अनाथाश्रम, दवाखाने, वस्तीगृह यांची स्थापना केली. अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता सद्विवेकबुद्धीने विचार करण्याची शिकवण त्यांनी जनतेला दिली.
जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत. भारत सरकारतर्फे विवेकानंदांचा जन्मदिवस हा 'युवक दिन' म्हणून साजरा केला जातो. नरेंद्रनाथाला म्हणजेच विवेकानंदांना दर्शनशास्त्रे, इतिहास, समाजशास्त्रे, कला, साहित्य इत्यादी अनेक विषयांत रुची आणि गती होती. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्गीता आदि धार्मिक साहित्यात त्याने विशेष आवड दाखवली. त्याला शास्त्रीय संगीताची देखील जाण होती आणि त्यांनी बेनी गुप्ता आणि अहमद खान या उस्तादांकडून गायन आणि वादनाचे रीतसर शिक्षणही घेतले. किशोरावस्थेपासूनच तो व्यायाम, खेळ आदी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेई. जुनाट अंधश्रद्धा आणि जात्याधारित भेदभाव यांच्या वैधतेसंबंधी त्याने लहान वयातच प्रश्न उपस्थित केले होते आणि सारासार विचार आणि व्यवहारी दृष्टिकोण यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्ट स्वीकारण्यास नकार दिला होता. विवेकानंद हे मित्र परिवारात प्रिय होते, त्यांचे मित्र त्यांना बिले या नावाने हाक मारत तर त्यांचे गुरु नोरेन या शब्दाने. त्यांना वाचन, व्यायाम, कुस्ती, मुष्टियुद्ध, पोहणे, होडी वल्हवणे, घोडेस्वारी, लाठीयुद्ध, गायन आणि वादन इत्यादी छंद होते.
राजा अजितसिंग खेत्री यांनी १० मे १८९३ रोजी स्वामीजींना ‘विवेकानंद’ असे नाव दिले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भात त्यांचे विचार खूप महान होते. शिक्षण म्हणजे एखाद्याच्या अंगी अगोदरपासून असलेल्या पूर्णत्वाचा आविष्कार होय. विधार्थी जर शाळेत येत नसेल तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे गेले पाहिजे असं ते म्हणत.
या योगी पुरुषाने शुक्रवार, ४ जुलै १९०२ या दिवशी कोलकात्या जवळील बेलूर मठात समाधी घेतली. समाधी घेण्याच्या दिवशी त्यांनी पहाटे बेलूर मठात परिव्राजकांना शुक्ल यजुर्वेदाचा पाठ शिकवला. आणि स्वामी प्रेमानंद या गुरुबंधूंसमवेत काही काळ फिरत असता त्यांना रामकृष्ण मठाच्या भविष्यासंबंधात काही सूचना केल्या. ध्यान करत असतांना रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी त्यांनी समाधी घेतली आणि चाळीस वर्षापर्यंत आपण जगू ही स्वतःची भविष्यवाणी खरी केली. कन्याकुमारी येथे समुद्रात काही अंतरावर त्यांचे विवेकानंद स्मारक विवेकानंद केंद्र या संस्थेच्या पुढाकाराने उभे राहिले आहे आहे. शब्द देखील अपूर्ण पडतील असं नरेंद्रच कार्य होत. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं विवेकानंद यांच्याबाबत म्हणणं वावगं ठरणार नाहीं.
Post a Comment