उत्कृष्ट वाचक पुरस्काराचे कुलगुरूंच्या हस्ते वितरण
उत्कृष्ट
वाचक पुरस्काराचे कुलगुरूंच्या हस्ते वितरण
सांगली | ४/५/२०१९
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मधील ग्रंथालयाच्या वतीने देण्यात येणारा उत्कृष्ट वाचक विद्यार्थी पुरस्कार महाविद्यालयातील ओंकार संदीप कोळी, प्रमोद हणमंत कांबळे, शेखर श्रीकांत पाटील (वाघमोडे) या तीन विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयातच वितरीत केला. आयुष्यात सर्वोच्च हिमशिखर गाठण्यासाठी, गरुडझेप घेण्यासाठी व योग्य दिशा दर्शविण्यासाठी ग्रंथालयेच उपयुक्त असतात असे कुलगुरूंनी प्रतिपादन केले.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सांगली येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील ग्रंथालयास सदिच्छा भेट दिली. प्राध्यापक वाचकांकडून ग्रंथालयाचा होणारा कमी वापर याची खंत व्यक्त करत विद्यार्थ्यांकडून होणारा ग्रंथालयाचा वापर याची पाहणी करत ग्रंथालयाकडून वाचकांना देण्यात येणाऱ्या सेवांचा आढावा घेतला. बदलत्या तंत्रज्ञानानुसार ग्रंथालयाकडून इलेक्ट्रॉनिक स्वरुपात सेवा पुरविण्यासाठी जास्तीत-जास्त प्रयत्न करावेत असे आवाहन कुलगुरूंनी ग्रंथपाल प्रा. जे.डी. हाटकर यांना व्यक्त केले. त्याचबरोबर वाचन कक्षातील विद्यार्थ्यांशी हितगुज करत अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी व ग्रंथालयाचा होणारा उपयोग याविषयी माहिती घेत त्या अडचणी महाविद्यालयाने तत्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत असे मत कुलगुरूंनी व्यक्त केले.
यावेळेस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, प्रा. डॉ. प्रभा पाटील, प्रा. डॉ. बी. डी. पाटील आदींसह सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth Sangli - Dr.Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
(Bharati Vidyapeeth Sangli - Dr.Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment