Header Ads

Loknyay Marathi

प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांना शिवाजी विद्यापीठाचा ‘पहिला गुणवंत प्राचार्य पुरस्कार'

प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांना शिवाजी विद्यापीठाचा ‘पहिला गुणवंत प्राचार्य पुरस्कार'

सांगली | १८/११/२०१९


शैक्षणिक व संशोधन विश्वात मानाचा शिरपेच धारण करणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या गुणवंत प्राचार्य पुरस्काराने भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांना सन्मानित करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठाच्या ५७ व्या वर्धापनदिनानिमित्ताने राजर्षी शाहू सभागृहात संपन्न झालेल्या शानदार सोहळ्यात प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांना सपत्नीक शिवाजी विद्यापीठ गुणवंत प्राचार्य पुरस्काराने  समारंभाचे प्रमुख पाहुणे नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले व शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मान पत्र, शाल, श्रीफळ देवून गौरविण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के प्रमुख उपस्थित होते. 

शैक्षिण अर्हता, अध्ययन, अध्यापन, मूल्यमापन, संशोधन, शिष्यवृत्ती, विविध पुरस्कार, विविध कार्यकारी मंडळाचे अधिकार, विस्तार कार्य, कार्यकारणी सहभाग, विविध कार्यक्रमांचे आयोजन, आदी निकषानुसार सदर पुरस्कारासाठी विद्यापीठ निवड समितीने डॉ. डी. जी. कणसे यांची एकमताने निवड केली. 

भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांची प्रेरणा व भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू, कार्यवाह आ. डॉ. विश्वजीत कदम, विभागीय मानद संचालक डॉ. एच. एम. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटवित शिवाजी विद्यापीठ व भारती विद्यापिठाच्या विविध प्रकारच्या प्रशासकीय समितीत कार्य केले आहे. 

पुरस्काराविषयी बोलताना डॉ. डी. जी. कणसे म्हणाले की, मी केलेल्या चांगल्या कार्याची दखल शिवाजी विद्यापीठाने घेतली याबद्दल शिवाजी विद्यापीठाच्या सर्व अधिकारी व पदाधिकारी यांचा मी ऋणी आहे. पुरस्कारामुळे मला काम करण्यास अधिक प्रेरणा मिळाली. त्याबरोबरच जबाबदारीही वाढली आहे. शिवाजी विद्यापीठ व भारती विद्यापीठाचे मी मनःपूर्वक आभार मानतो.

प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांना शिवाजी विद्यापीठाचा पहिला गुणवंत प्राचार्य पुरस्कार' प्राप्त झाला याबद्दल डॉ. महाविद्यालयाच्या वतीने जेष्ठ प्रा. पी. एन. गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी महाविद्यालयाच्या विज्ञान प्रमुख प्रा. सौ. प्रभा पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या प्रसंगी कला व वाणिज्य प्रमुख प्रा. तानाजी सावंत यांच्या समवेत महाविद्यालयातील विविध विभागाचे प्रमुख व सहकारी प्राध्यापक उपस्थित  होते.   

(Bharati Vidyapeeth Sangli - Dr.Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)