भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा:
भारताचं संविधान हे
जगातील सर्वात मोठं आणि सर्वात विस्तृत संविधान आहे. 26 नोव्हेंबर 1949 आणि 26 जानेवारी 1950 भारतीय संविधानाच्या इतिहासातील या दोन
महत्त्वाच्या तारखा आहेत. 26 नोव्हेंबर 1949 रोजी
आपण संविधानाचा स्विकार केला होता तर 26 जानेवारी 1950 रोजी ते
लागू करण्यात आलं. संविधान ज्या दिवशी स्विकारलं त्या तारखेला म्हणजे 26 नोव्हेंबरला
संविधान दिन साजरा केला जातो आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन.
भारतीय समाजात अमुलाग्र परिवर्तन घडवून आणणारी लोकशाहीप्रधान
राज्यघटना ही संपूर्ण जगात श्रेष्ठ ठरली आहे. धर्मनिरपेक्ष व सामाजिक
न्यायव्यवस्थेचे अधिष्ठान असलेल्या राज्यघटनेतील स्वातंत्र्य, बंधुता व
समानता या तत्वांचा समावेश आहे. भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी या तत्वांची
सर्वांनी कृतीतून पूर्तता केली पाहिजे. यासाठी प्रत्येकाने देशहिताचे संकल्प करून
ते पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे
प्रतिपादन प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी केले.
सांगली येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात भारताचा
७१ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना
प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे बोलत होते. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर
सेवक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. रुपाली कांबळे
यांनी केले होते.
(Bharati Vidyapeeth’s Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment