सर्व भाषांचा सर्वांगीण विकास करणे व त्या दृष्टीने संशोधन करणे हेच खरे मोठे आव्हान आहे - डॉ. भालबा विभूते
सर्व भाषांचा सर्वांगीण विकास करणे व त्या दृष्टीने संशोधन करणे हेच खरे मोठे आव्हान आहे - डॉ. भालबा विभूते
आपण इंग्रजी भाषेसाठी फारच आग्रही भूमिका घेतल्यामुळे इतर भाषांचे फार मोठे नुकसान होत असते. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेला फार मोठा धोका निर्माण होतो.त्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणात सर्व भाषांचा सर्वांगीण विकास करणे व त्यासाठी नवनवीन संशोधन करणे हेच खरे मोठे आव्हान आहे आहे, असे मत शिवाजी विद्यापीठाच्या प्रौढ व निरंतर शिक्षण विभागाचे संचालक मा. डॉ. भालबा विभूते यांनी व्यक्त केले.
सांगली येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयामध्ये अंतर्गत गुणवत्ता विभागाच्या वतीने 'भारतीय व्यवस्थेपुढील आव्हाने : धोरण आणि उपाययोजना ' या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाच्या प्रौढ व निरंतर शिक्षण विभागाचे संचालक मा. डॉ. भालबा विभूते व शिवाजी विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉ. अनिल गवळी यांच्या हस्ते झाले. परिषदेच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य व डॉ पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत परिषदेच्या समन्वयक प्रा. सौ. उज्वला देसाई यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे म्हणाले की, प्राध्यापक व विद्यार्थी यांच्यात संशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी महाविद्यालयात विविध विषयांवर दरवर्षी राष्ट्रीय परिषदांचे आयोजन केले जाते.
मार्गदर्शनपर भाषणात, शिवाजी विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉ. अनिल गवळी म्हणाले की, भारतीय व्यवस्थेत विविध भाषा असून त्या सर्व भाषा विकसित करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण महत्वाची भूमिका बजावणार आहे. त्या दृष्टीने तरुणाईने अभ्यास व संशोधन केले पाहिजे. त्यादृष्टीने राष्ट्रीय परिषदा ही काळाची गरज आहे.
दुपारच्या सत्रात शारीरिक शिक्षण विषयाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.महेंद्र कदम पाटील, भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस. डी. शिंदे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान झाले.
कार्यक्रमासाठी विज्ञान विभाग प्रमुख प्रा .डॉ. सौ. प्रभा पाटील, कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. संजय ठिगळे त्याबरोबरच विविध विद्यापीठातून संशोधक प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
परिषद यशस्वी करण्यासाठी अंतर्गत गुणवत्ता विभाग प्रमुख डॉ. अमित सुपले, खजिनदार प्रा. सौ. रुपाली कांबळे, यांनी परिश्रम घेतले. त्याचबरोबर विविध विभागाचे प्रमुख, सहकारी प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार परिषदेचे सचिव डॉ. नितीन गायकवाड यांनी मानले. सुत्रसंचलन प्रा. डॉ. सौ. पी. एन. शेळके यांनी केले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment