yuva MAharashtra विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक टी.व्ही चॅनल - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक टी.व्ही चॅनल

विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक टी.व्ही चॅनल


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र तर्फे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी खालील १२ शैक्षणिक टी.व्ही चॅनल हे जिओ टी.व्ही (जिओ सिम धारक यांना उपलब्ध) वर ज्ञानगंगा या नावाने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे ज्याने ४ माध्यमांसाठी शैक्षणिक चॅनल सुरु केले आहेत.

1) ज्ञानगंगा - इ.१२ विज्ञान 
2) ज्ञानगंगा - इ. १० वी इंग्रजी माध्यम 
3) ज्ञानगंगा - इ. १० वी मराठी माध्यम
4) ज्ञानगंगा - इ. १० वी उर्दू माध्यम
5) ज्ञानगंगा - इ. ९ वी इंग्रजी माध्यम
6) ज्ञानगंगा - इ. ९ वी मराठी माध्यम
7) ज्ञानगंगा - इ. ९ वी उर्दू माध्यम
8) ज्ञानगंगा - इ.८ वी  मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यम
9) ज्ञानगंगा - इ.७ वी  मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यम
10) ज्ञानगंगा - इ.६ वी  मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यम
11) ज्ञानगंगा - इ.५ वी  मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यम
12) ज्ञानगंगा - इ.३ री व ४ थी मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यम

सदर चॅनल पाहण्यासाठी जिओ टी.व्ही या APP वर Category मधून Educational निवडा व वरील चॅनल मधील आपल्याला पाहावयाचा चॅनल निवडा.
सदर जिओ टी.व्ही वर प्रक्षेपित होणारे सर्व व्हिडीओ आपणास राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या YouTube Channel वर देखील उपलब्ध होतील.
परिषदेकडून प्रसारीत होणाऱ्या अभ्यासमाला, प्रशिक्षणे, अवांतर वाचनाची पुस्तके, विविध शासन निर्णय, शाळा, पालक, विद्यार्थी, शिक्षक यांना आवश्यक असणारी माहिती आपणास तात्काळ आपल्या मोबाईल वर प्राप्त करून घ्यावयाची असल्यास कृपया राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या Jio Chat Channel ला आपण जॉईन होऊ शकता. 
यासाठी आपल्या स्मार्टफोन मध्ये Jio Chat हे प्ले स्टोअर , App स्टोअर मधून डाऊनलोड करा , आपला मोबाईल क्रमांक व नाव टाकून App मध्ये नोंदणी करा व Channel मध्ये SCERT, Maharashtra  हे channel शोधा व त्याला जॉईन करा अथवा खालील लिंक ला क्लिक करून चॅनल ला जॉईन करा.

https://jiochat.com/channel/600000000955/1  

तरी राज्यातील विद्यार्थी, शिक्षक,पालक यांनी वरील सुविधेचा लाभ घ्यावा.

--
दिनकर पाटील
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र , पुणे