डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने सांगली येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन महाविद्यालयातील क्रीडा विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
प्रारंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे कला व वाणिज्य शाखेचे प्रमुख प्रा. तानाजी सावंत, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. संजय ठिगळे, शारीरिक शास्त्र विभागाच्या प्रा. रुपाली कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना प्रा. तानाजी सावंत म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळाकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये मानसिक आरोग्याबरोबरच शाररिक आरोग्य महत्त्वाचे आहे. क्रीडा क्षेत्रात यश प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मेजर ध्यानचंद यांचा आदर्श घ्यावा.त्याशिवाय खऱ्या अर्थाने सर्वागीण विकास होणार नाही.
Post a Comment