भूजल पातळी वाढविण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने कार्यरत राहण्याची गरज -- डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी
भूजल पातळी वाढविण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने कार्यरत राहण्याची गरज -- डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी
भूजल पातळी वाढल्या शिवाय खऱ्या अर्थाने कृषी क्षेत्राचा सर्वागीण होणार नाही. त्यासाठी स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयीन तरुणाई आणि ग्रामस्थांनी एकत्रित येऊन अटल भूजल योजनेच्या माध्यमातून कार्य करण्याची नितांत गरज आहे. विशेषतः तरुणाईने जनजागृतीचे कार्य करावे असे मत राज्य भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे राज्य संचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केले.
सांगली येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयास डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सदिच्छा भेट दिली. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. संजय ठिगळे यांनी केले.
याप्रसंगी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना गाडगे महाराज समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डी. जी. कणसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना प्राचार्य. डॉ. डी. जी. कणसे म्हणाले की, अटल भूजल योजनेच्या माध्यमातून भूजल पातळी वाढविण्यासाठी तरुणाईने वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करण्याची नितांत गरज आहे.
याप्रसंगी विज्ञान विभाग प्रमुख प्रा. डॉ प्रभा पाटील, कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत त्याचबरोबर विविध विभागाचे प्रमुख व प्राध्यापक व सेवक वर्ग उपस्थित होता.
Post a Comment