Header Ads

Loknyay Marathi

वाढती रोगराई रोखण्यासाठी स्वच्छता अभियान काळाची गरज: प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे

वाढती रोगराई रोखण्यासाठी स्वच्छता अभियान काळाची गरज: प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे




वाढती रोगराई रोखण्यासाठी स्वच्छता अभियान काळाची गरज आहे.
शहर स्वच्छतेचा निर्धार करून सलग तीन वर्षे स्वच्छतेच्या चळवळीत कार्यरत असणारे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व निर्धार फाऊंडेशनचे अध्यक्ष मा. राकेश दड्डणावर यांनी  'लढा कोरोनाशी' या उपक्रमाअंतर्गत इनाम धामणी येथे सामाजिक अंतर राखून राबविलेल्या 'स्वच्छ्ता अभियान' उपक्रमाचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. असे मत प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी व्यक्त केले

निर्धार फाऊंडेशनचे अध्यक्ष मा. राकेश दड्डणावर यांनी राबविलेल्या स्वच्छ्ता अभियान उपक्रमाअंतर्गत इनाम धामणी येथे सामाजिक अंतर राखून राबविलेल्या उपक्रमाला डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, माजी विद्यार्थी संघाचे समन्वयक प्रा. संजय ठिगळे, डॉ. जया कुऱ्हेकर व डॉ. विकास कुऱ्हेकर  यांनी भेट दिली.

यावेळी निर्धार फाउंडेशन मध्ये कार्यरत असणारे कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना प्रा. संजय ठिगळे म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून घडलेले अनेक विद्यार्थी समाजाभिमुख कार्ये करीत आहेत. कोरोनाच्या महामारीत सुद्धा विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून प्रबोधनाची चळवळ अधिक गतिमान करण्याची गरज आहे. 

आपल्या कार्याविषयी बोलताना राकेश दड्डणावर म्हणाले की पुढच्या टप्प्यात अंकली गाव स्वच्छ करण्याचा संकल्प केला आहे. 

प्राचार्य डी.जी.कणसे म्हणाले की राकेश दड्डणावर यांचा उपक्रम स्तुत्य असून ते आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत याचा आम्हास सार्थ अभिमान वाटतो. त्यांचा आदर्श तरुणाईने घ्यावा.