डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती साजरी
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती साजरी
सांगली : येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची १२९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथालय विभागाच्या वतीने कोरोनाचे सर्व नियम पाळून करण्यात आले. शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांचे शुभहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
कोरोनाच्या काळात महाविद्यालये बंद असली तरी ग्रंथालये आपले रूप बदलत आहे.प्रगल्भ व्यक्तीमत्व निर्माण होण्यासाठी डिजीटल वाचनसाहित्याचा सर्वांनी वापर करावा असे आवाहन डॉ. डी. जी. कणसे केले.
यावेळी ग्रंथपाल प्रा. सौ. जे. डी. हाटकर यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करत डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या कार्याचा आढावा घेतला.
कार्यक्रमास महाविद्यालयातील सायन्स विभाग प्रमुख डॉ. सौ. प्रभा पाटील, कला व वाणिज्य विभागप्रमुख प्रा. टी.आर. सावंत त्याचबरोबर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. उपस्थितांचे आभार ग्रंथालय समितीचे संयोजक प्रा. डॉ. एस.एन. बोऱ्हाडे यांनी मानले.
Post a Comment