डॉ. पतंगराव कदम कॉलेजला खोखो (पुरुष) स्पर्धेत विजेतेपद
डॉ. पतंगराव कदम कॉलेजला खोखो (पुरुष) स्पर्धेत विजेतेपद
शिवाजी विद्यापीठ व डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली विभागीय खो-खो (पुरुष) आयोजित स्पर्धेमध्ये डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले. शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे यांच्या हस्ते विजेत्या संघाला फिरता चषक प्रदान करण्यात आला. डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर संपन्न झालेल्या या विभागीय स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्यातून एकूण 13 संघानी प्रत्यक्ष सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये सांगलीतील कस्तुरबाई वालचंद कॉलेजने द्वितीय क्रमांक, डॉ. एन. डी. पाटील नाईट कॉलेजने तृतीय क्रमांक तर बोरगाव येथील एम. पी. पाटील कॉलेजने चतुर्थ क्रमांक संपादन केला.
हे सर्व विजेते संघ आंतर विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले असून जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर येथे पार पडणाऱ्या आंतर विभागीय स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. सर्व विजयी संघांचे व त्यांच्या खेळाडूंचे प्राचार्य डॉ. डी. जी.कणसे यांनी अभिनंदन केले. यावेळी प्रा. टी.आर. सावंत, प्रा. (डॉ.) एस. एन. बोऱ्हाडे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. अमर तुपे आणि सर्व प्राध्यापक उपस्थित होते. शेवटी प्रा.रूपाली कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने मैदानावर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी डॉ. महेश कोल्हाळ, डॉ. रामचंद्र देशमुख, प्रा. मंगेश गावित, प्रा. नलेश बहिराम, प्रा. अक्षय खडतरे आदींनी परिश्रम घेतले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment