Header Ads

Loknyay Marathi

डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेचे आयोजन...

डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेचे आयोजन...       
सांगली:
मूलभूत व उपयोजित विज्ञानातील समकालीन प्रवाह या विषयावर दोन दिवसांची राष्ट्रीय परिषद दिनांक २१  व  २२ जानेवारी २०२२ रोजी ऑनलाईन पद्धतीने डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली येथे आयोजित केली आहे. ही परिषद चौथ्यांदा आयोजित केली जात आहे. यापूर्वी तीन वेळा ही परिषद प्रत्यक्षात  घेतली असून यावर्षी कोरोनाच्या पार्शवभूमीवर ही परिषद ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे असे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी प्रत्रकारांशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले या परिषदेसाठी संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत तर या परिषदेत डॉ. श्रीनिवास कावेरी (फ्रान्स), डॉ. विवेक धाम (युरोप), डॉ. संजीव मरदूर (कोरिया), डॉ. ए. डी. जाधव (कोल्हापूर), डॉ. एस. जी. दळवी (पुणे) व डॉ. हबीब पठाण (पुणे) अशी प्रमुख वक्ते  मार्गदर्शन करणार आहेत.

या राष्ट्रीय परिषदेमध्ये विज्ञान क्षेत्रातील सर्व विभागाचे मान्यवर आपले विचार मांडणार असल्याने ही परिषदेचा समाजातील सर्व घटकांना उपयोग होईल. या कार्यक्रमाचे आयोजन झूम या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर होणार आहे. विज्ञान क्षेत्रातील विद्यार्थी, शिक्षक व रिसर्च स्कॉलर्स यांनी जास्तीत जास्त स्वरुपात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे यांनी केले.

या परिषदेच्या आयोजनासाठी समन्वयक डॉ. व्ही. बी. आवळे व टीम अथक परिश्रम घेत आहेत. भारती विद्यापीठ प्र-कुलगुरू, कार्यवाह व राज्यमंत्री मा.ना.डॉ.विश्‍वजित कदम, कुलपती मा.डॉ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समिती अध्यक्षा मा. विजयमाला कदम कुलगुरु डाॅ. माणिकराव सांळुखे, विभागीय मानद संचालक मा. डॉ. एच.एम. कदम, प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी या परिषदेस शुभेच्छा दिल्या आहेत.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)