लोकशाही टिकवणे काळाची गरज : प्रा.खडसे
लोकशाही टिकवणे काळाची गरज : प्रा.खडसे
सांगली: जगातील सर्वात मोठी लोकशाही आपल्या देशाची आहे. ती अबाधित ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी आपली आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि एकात्मता ही मूल्ये रूजली पाहिजेत. त्यासाठी लोकशाही टिकवने काळाची गरज आहे. असे प्रतिपादन प्रा. डॉ. एस. के. खडसे यांनी केले. येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मतदार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन वेबिनार प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, लोकशाही टिकवायची असेल तर देशातील प्रत्येक मतदाराने आपले कर्तव्य ओळखून योग्य त्या उमेदवाराला मतदान केले पाहिजे. मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. डी. जी. कणसे हे होते. आपल्या अध्यक्षिय मनोगतामध्ये ते म्हणाले की, मतदार हा लोकशाहीचा गाभा आहे. त्यावरच आपल्या देशाचा सर्वांगीण विकास अवलंबून आहे.
या प्रसंगी कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत, डॉ. ए. एम सरगर, डॉ. एम. टी. कोल्हाळ, डॉ. व्ही. ए. सातपुते, प्रा. वाय सी. धुळगंड, महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. विकास आवळे यांनी केले. प्रा. आर. एस. कांबळे यांनी सूत्र संचलन केले व डॉ. व्ही. एस. कुंभार यांनी आभार मानले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment