Header Ads

Loknyay Marathi

भारतरल लता मंगेशकर यांचे निधन

संगीत युग संपले

मास्टर दिनानाथ मंगेशकर आणि शेवंती मंगेशकर या दांपत्याच्या घरात इंदौर येथे दिनांक २८ सप्टेंबर १९२९ रोजी लता मंगेशकर यांचा जन्म झाला. अगदी लहान वयापासूनच लतादिदींनी गायकीला सुरुवात केली. पुढे अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमातून आणि नंतर बॉलिवूड, मराठी या सिनेक्षेत्रासह अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या गोड आवाजाने कोट्यवधी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

अनेक दशके त्यांनी आपल्या मधूर आवाजाने रसिकांची मने जिंकली नव्हे तर त्यांच्या मनावर राज्य केले. लता मंगेशकर यांनी त्यांच्या जीवनात हजारो गाणी गायली, ज्यातील काही गाणी लतादिदींप्रमाणेच अजरामर आहेत. लतादिदींनी अगदी लहानपणापासूनच संगीत हेच आपले आयुष्य बनवले.

लता मंगेशकर भारतातील एक सर्वोत्कृष्ट गायिका होत्या. ... त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, विसाहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये (प्रामुख्याने मराठी) गायन केले आहे.


भारतरत्न लता मंगेशकर यांच्याशी संबंधित निवडक विडीओज, मुलाखत, मराठी गाणी, हिंदी गाणी, इतर माहिती स्त्रोत

https://www.dnyansagar.in/2022/01/Lata-Mangeshkar.html?m=1

देशातील महान गायिका, गानसरस्वती, भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे ९२व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. आपल्या स्वर्गीय सुरांनी अनेक गीतांना अजरामर करणाऱ्या लतादिदींचा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

लता मंगेशकर (Bharat Ratna Lata Mangeshkar) यांच्या निधनाची बातमी देशभर पसरताच संपूर्ण देशभरात शोकाची लाट पसरली आहे. तसेच, लतादिदींच्या जाण्याने संगीतविश्व, कलाविश्व पोरके झाले आहे.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya Sangli)