डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात अभिजित कदम यांची जयंती साजरी
डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात अभिजित कदम यांची जयंती साजरी
सांगली : भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अभिजित कदम यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.जी.कणसे यांच्या हस्ते करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अभिजितदादा कदम यांच्याविषयी बोलताना डॉ. कणसे म्हणाले की, अभिजितदादा हे तरूणांचे प्रेरणास्रोत होते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा असे शिक्षण त्यांना मिळाले पाहिजे असे त्यांना नेहमी वाटत होते. पुस्तकी ज्ञानाबरोबर कला आणि क्रीडा क्षेत्रात विद्यार्थी पुढे आला पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा. भारती विद्यापीठाचा विस्तार हा जागतिक स्तरावर पोहचला पाहिजे हे त्यांचे स्वप्न होते. आज भारती विद्यापीठ शिक्षणाबरोबर कला आणि क्रीडा क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करत आहे. खऱ्या अर्थाने अभिजित दादांचे स्वप्न पूर्णत्वास जात आहे याचा मला विशेष आनंद आहे.
यावेळी महाविद्यालयाच्या विज्ञान विभाग प्रमुख प्रा. डॉ. सौ. प्रभा पाटील, कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. नितीन गायकवाड, प्रा. जयश्री हाटकर, डॉ. वर्षा कुंभार, प्रा. सतीश कांबळे, यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment