डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा
सांगली : भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे उपस्थित होते. या वेळी बोलताना डॉ. कणसे म्हणाले की, प्रत्येक स्त्रीला आयुष्यात मुलगी, आई, बहीण, पत्नी, आई आशा अनेक भूमिकांतून जावे लागते. आधुनिक स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसत आहे. स्त्री-पुरूष समानता हे मूल्य केवळ कागदावर न राहता त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रथम स्त्रीला सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. याप्रसंगी डॉ. डी.जी. कणसे यांनी उपस्थित सर्व महिलांना गुलाबाचे रोप देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. शिल्पा साळुंखे यांना INSO पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महिला दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात या वेळी 'सामाज माध्यमातील स्त्री चित्रण' या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले होते. त्याचबरोबर रांगोळी स्पर्धा, विविध फनी गेम्स, प्रश्नमंजुषा स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील सर्व महिला शिक्षिका, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे नियोजन लेडीज असोसिएशनच्या प्रमुख प्रा. भारती भाविकट्टी यांनी केले. विविध स्पर्धांचे आयोजन प्रा. सुलभा तांबडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. वासंती गावडे यांनी केले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment