Header Ads

Loknyay Marathi

सांगली विभागीय जलतरण क्रीडा स्पर्धेत डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय संघ विजयी

 सांगली विभागीय जलतरण क्रीडा स्पर्धेत डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय संघ विजयी


सांगली:  येथील कन्या महाविद्यालय मिरज आयोजित, सांगली विभागीय जलतरण क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा कार्यालय जलतरण तलावामध्ये पार पडल्या. सदर स्पर्धेमध्ये भारती विद्यापीठाच्या डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयातील खेळाडू वरद कदम याने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. ५० मी. १०० मी. फ्रीस्टाईल, बॅकस्ट्रोक, ब्रेस्टस्ट्रोक बटरफ्लाय तसेच २०० मी. फ्रीस्टाईल, बॅकस्ट्रोक ब्रेस्टस्ट्रोक अशा एकूण बारा प्रकारात प्रथम क्रमांक १५०० मी. फ्रीस्टाईल प्रकारात तृतीय क्रमांक मिळवला संघासाठी एकूण ६१ गुण मिळवून महाविद्यालयास सांघिक विजेतेपद वैयक्तिक विजेतेपद खेचून आणले. वरद कदम याने नैपुण्यपूर्ण कामगिरी करत इतिहास रचला.

सदर विद्यार्थ्यांचे अभिनंदन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी केले सदर विद्यार्थ्यास शारीरिक शिक्षण संचालक अमर तुपे प्रा. रूपाली कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)