डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न
सांगली : भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आणि स्पर्धांच्या माध्यमातून सामाजिक सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाविद्यालयातील अनेक स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी उपस्थित स्पर्धकांना शुभेच्छपर संदेश देताना म्हणाले की, 'आजच्या या स्पर्धेच्या निमित्ताने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तिमत्त्व आणि देशाप्रती त्यांनी केलेल्या कार्याची माहिती आपणा सर्वांना होणार आहे. राज्य घटनेचे शिल्पकार, उच्च विद्या विभूषित, गरीब व वंचित घटकांच्या न्याय आणि हक्कासाठी लढणारे, कायदे तज्ज्ञ असे त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या कार्याचा गौरव अशा प्रकारच्या उपक्रमांच्या माध्यमातून होणे गरजेचे आहे.'
या स्पर्धेत कु. धिरज थोरात (बी. एस्सी. भाग १) याने प्रथम क्रमांक मिळविला तर संगिता खोत (बी. ए. भाग २)हिने द्वितीय क्रमांक आणि ओंकार पाटील (बी. ए. भाग ३) याने तृतीय क्रमांक मिळविला. या स्पर्धेचे परीक्षण प्रा.डाॅ. कृष्णा भवारी आणि प्रा. सतीश कांबळे यांनी केले.
यावेळी महाविद्यालयातील कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी.आर. सावंत, प्रा. डॉ. एस. एन. बोऱ्हाडे व महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. नितीन गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. विकास आवळे यांनी केले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment