शाश्वत विकासासाठी जैवविविधतेचे संवर्धन आवश्यक - डॉ. योगेश कोळी
शाश्वत विकासासाठी जैवविविधतेचे संवर्धन आवश्यक - डॉ. योगेश कोळी
सांगली - शाश्वत विकासाकडे वाटचाल करताना जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन वेळीच केले नाही तर भविष्यात आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागेल. पश्चिम घाटातील जैवविविधतेचे संवर्धन आपणच करावे लागेल. अधिवास नाहीसा होणे, अति शिकार, नव्या जातीचा प्रवेश व वन्यजीवांची चोरटी शिकार अशा अनेक कारणामुळे जैवविविधतेचा धोका उत्पन्न होतो असे प्रतिपादन डॉ. योगेश कोळी यांनी केले.
येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात नेचर क्लब व प्राणीशास्त्र विभागामार्फत आयोजित केलेल्या ऑनलाईन व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. डी. कणसे होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की संवर्धनासाठी राज्यस्तरीय तसेच जागतिक पातळीवर एकजूट निर्माण करणे तसेच जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी भविष्यकालीन व्यवस्थापन आणि जैवसंपदेचा उपयोग सध्याच्या व भविष्यकालीन पिढी च्या फायद्यासाठी शाश्वत् केला पाहिजे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. डी जी. कणसे म्हणाले की, जैवविविधतेचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पृथ्वीतलावरील प्रत्येक सजीव हा महत्त्वाचा आहे. आपण जैवविविधतेचे व्यवस्थापन केले आणि प्रजाती नष्ट होण्यास प्रतिबंधित केले तरच आपण त्यांचे संवर्धन करू शकतो.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राणिशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सौ. प्रभा पाटील यांनी केले. प्रा. नलेश बहिरम यांनी आभार मानले. डॉ. सौ. वर्षा कुंभार समन्वयक नेचर क्लब यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment