Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी
 
सांगली : भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. 
 
या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे विद्यार्थ्यांना संदेश देताना म्हणाले की, 'अण्णा भाऊ साठे यांनी साहित्यातून समाजाला क्रांतिकारी विचार दिला. वास्तववादी लेखनीने अण्णा भाऊंनी मराठी वाचकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवले. या लोकशाहीराने महाराष्ट्राच्या साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला. १ ऑगस्ट १९२० या दिवशी अण्णा भाऊंच्या रूपाने एका ताऱ्याचा उदय झाला तर याच दिवशी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक नावाच्या दुसऱ्या ताऱ्याचा अस्त झाला. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही एक अविस्मरणीय घटना होती. लोकमान्य टिळक यांनी इंग्रजांविरुद्ध लढा उभारला. तसेच स्वातंत्र्य चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग होता. 'भारतीय असंतोषाचे जनक' म्हणून त्यांची संपूर्ण भारतात आजही ख्याती आहे. या दोन्ही महापुरुषांच्या कार्याचे स्मरण करणे गरजेचे आहे. 

यावेळी महाविद्यालयातील कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. नितीन गायकवाड व प्रा. जयश्री हाटकर, प्रा. वर्षा कुंभार, प्रा. सतीश कांबळे, प्रा. नंदकुमार नाटके, प्रा. नरेश पवार यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)