डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात भित्तीपत्रकाचे अनावरण व जनजागृती फेरीचे आयोजन
डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात भित्तीपत्रकाचे अनावरण व जनजागृती फेरीचे आयोजन
सांगली: भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात स्वातंत्र्य भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. 'हर घर तिरंगा, घर घर तिरंगा' अभियानांतर्गत महाविद्यालयात 'स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचे कार्य' या विषयावरील भित्तीपत्रकाचे अनावरण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.जी.कणसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सांगली वाडी परिसरात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जनजागृती व देशभक्तीपर घोषणा देत फेरी काढण्यात आली. या उपक्रमात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, स्वयंसेवक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाला कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत, कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास आवळे , डॉ. रुपाली कांबळे, प्रा. सतिश कांबळे, प्रा. अमोल कुंभार, प्रा. सुलभा तांबडे इ. उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment