डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
सांगली : भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात हाॅकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे म्हणाले की, मेजर ध्यानचंद यांची क्रीडा क्षेत्रातील कामगिरी अलौकिक आहे. त्यांच्या कष्टाचा, त्यागाचा आदर्श तरुणांनी डोळ्यासमोर ठेवून देशाचे नाव क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल केले पाहिजे. मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली ऑलिंपिकमध्ये भारताने तीन वेळा सुवर्णपदके मिळवून दिली आहेत. त्यांचा जन्मदिन "राष्ट्रीय क्रीडा दिन" म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो .
यावेळी कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी.आर.सावंत, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. डॉ. रूपाली कांबळे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. अमर तुपे यांच्या सह महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharari Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment