डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
सांगली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात दिनांक १२ ऑगस्ट २०२२ रोजी सांस्कृतिक विभागाच्या वतीने देशभक्तीपर गीतगायन व नृत्ये यांचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विदयापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे होते. आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, देशभक्ती ही फक्त स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनापुरती न दाखवता प्रत्येक क्षणी ती आपल्या कृतीतून दिसावी. पुढे बोलताना ते असे म्हणाले की, देशाच्या विकासासाठी निर्मळ मनाने आणि देशभक्ती भावनेने सर्वांनी एकत्र आले पाहिजे.
या कार्यक्रमात कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील मुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. कनिष्ठ विभागातील अकरावी विज्ञान शाखेतील कु. अश्विनी बावदने, कु. नाजिया बागवान, कु. गायत्री भगत आणि कु. प्रगती सूर्यवंशी या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत सादर केले. बी. एस्सी. भाग १ मधील कु. तवणीत कटारिया, अंजली चोले व १२ वी बँकिंग मधील कु. वैष्णवी सूर्यवंशी यांनी वैयक्तिक नृत्य सादर केले. १२ वी बँकिंग मधील कु.रुबिना मुल्ला, कु. ऋतुजा सूर्यवंशी, कु. सकिना नजरी आणि कु. बन्सिका राजपूत यांनी सामूहिक नृत्य सादर केले.
या कार्यक्रमाला कला व वाणिज्य विभागप्रमुख प्रा. टी. आर. सावंत व कनिष्ठ विभागप्रमुख प्रा. ए. एल. जाधव यांच्या सह महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि शिक्षकेत्तर कर्मचारी होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. कु. सुलभा तांबडे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. कृष्णा भवारी यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वर्षा कुंभार यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. सतीश कांबळे, प्रा. नरेश पवार व प्रा. नंदकुमार नाटके यांनी केले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment