डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात नागपंचमी उत्साहाने साजरी
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात नागपंचमी उत्साहाने साजरी
सांगली दि. २ ऑगस्ट२२ रोजी महाविद्यालयाच्या लेडीज असोसिएशन मार्फत महाविद्यालयात नागपंचमी उत्साहाने करण्यात आली.
यानिमित्त विविध प्रकारचे पारंपारिक खेळ आणि गाणी सादर करून सर्व विद्यार्थिनी व महिला प्राध्यापक तसेच शिक्षकेतर सेवक यांनी पंचमीचा आनंद लुटला.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे होते. त्यांनी यानिमित्त सर्वांना भारतीय सण, परंपरा तसेच आजच्या काळात त्यांचे महत्त्व या विषयी मार्गदर्शन केले व श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचे उदघाटन केले. लेडीज असोसिएशनच्या प्रमुख प्रा. भारती भावीकट्टी यांनी स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
.
Post a Comment