कोविड 19 ने सामान्य माणसालाही सूक्ष्मजीवशास्त्र शिकविले - प्रा. अरविंद देशमुख
कोविड 19 ने सामान्य माणसालाही सूक्ष्मजीवशास्त्र शिकविले - प्रा. अरविंद देशमुख
सांगली दि.17/10/2022 येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महविद्यालयात आयोजित व्याख्यानात बोलताना प्रा.अरविंद देशमुख म्हणाले, की सूक्ष्मजीवशास्त्र या विषयाचे महत्त्व अनन्यसाधारण . सूक्ष्मजीवांच्या विश्वाबद्दल सामान्य माणूस अनभिज्ञ असतो. कोविड नंतर मात्र लोक याविषयी अधिक माहिती घेवू लागले. फक्त वैद्यकीय क्षेत्रच नव्हे तर शेती, औषधनिर्मिती, संरक्षण, पर्यावरण, औद्योगिक , अन्न सुरक्षा, दुग्ध व्यवसाय व जैवतंत्रज्ञान यासारख्या असंख्य क्षेत्रात सूक्ष्मजीवशास्त्र आघाडीवर आहे. विद्यार्थ्यांनी याचा अभ्यास केल्यास देशात व परदेशात त्यांच्यासाठी खूप मोठी संधी वाट पाहात आहे याविषयी शंका नाही. मायक्रोबायोलॉजीष्ट सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक,अध्यक्ष म्हणून देशमुख यांनी कोविड काळात खूप मोलाची कामगिरी केली आहे. त्याविषयी बोलताना ते म्हणाले की अणूयुद्ध भयंकर असतेच पण जैव युद्ध त्याहून अधिक भयंकर परिणाम करते. सूक्ष्मजीवशास्त्रज्ञानी यासाठी तयार असले पाहिजे. आतापासूनच यासाठी योजना आखली पाहिजे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे होते. यावेळी पोस्टर आणि मॉडेल स्पर्धेतील विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूक्ष्मजीवशास्त्राच्या विभागप्रमुख प्रा. कु. भारती भाविकट्टी यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. मारुती धनवडे यांनी केले तर आभार प्रा.आरिफ मुलाणी यांनी मानले.
Post a Comment