Header Ads

Loknyay Marathi

आपल्या सोबत अनाथांची दिवाळी साजरी करूया - डॉ. डी. जी. कणसे

आपल्या सोबत अनाथांची दिवाळी साजरी करूया - डॉ. डी. जी. कणसे


सांगली: आपल्यासोबत अनाथांची दिवाळी साजरी करूया असे प्रतिपादन भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य आणि शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे मा. सदस्य डॉ. डी. जी. कणसे यांनी केले.


दीपावली साजरी करत असताना आपणच फक्त आनंदी असून चालणार नाही तर आपल्याबरोबर वस्तीगृहात राहणाऱ्या मुला मुलींना सुद्धा दिवाळीचा आनंद मिळावा म्हणून थोडीशी 'मुठभर धान्याची मदत' करून त्यांचाही आनंद द्विगुणित करूयात या भावनेने भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने मुठभर धान्याची मदत व महाविद्यालयातर्फे दिवाळी सणानिमित्त काही जीवनावश्यक वस्तू मुला मुलींचे वसतिगृह कोळे, तालुका कराड, जिल्हा सातारा येथील वसतिगृहाचे संस्थापक समीर नदाफ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले व दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या त्याप्रसंगी ते बोलत होते. समीर नदाफ संस्थापक जिजाऊ मुला मुलींचे वसतिगृह कोळे ता.कराड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रूपाली कांबळे यांनी केले व प्रास्ताविक प्रा. सुलभा तांबडे यांनी केले व आभार डॉ. विकास आवळे यांनी मानले. याप्रसंगी प्रा. टी. आर. सावंत, प्रा. ए. एल. जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व सदस्य डॉ. ए. एम. सरगर, प्रा. ए. ए.पोळ, डॉ. महेश कोल्हाळ, प्रा. वाय. सी. धुळगंड, प्रा. डॉ. व्ही. ए. सातपुते. डॉ. ए. ए. कुंभार, प्रा. एस. डी. पाकले, प्रा. सतिश कांबळे आणि महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Bharati VidyapeethS Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)