Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी
       

सांगली : भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे म्हणाले की, सरदार वल्लभभाई पटेल यांचे कार्य राष्ट्र उभारणीसाठी अत्यंत मोलाचे आहे. भारतातील एक राजकीय व सामाजिक नेता म्हणून त्यांची ख्याती सर्वदूर आहे. स्वतंत्र भारताचे ते पहिले गृहमंत्री होते. भारताची एकता आणि अखंडता यासाठी त्यांनी केलेले कार्य फार महत्त्वाचे आहे. म्हणूनच भारत सरकारने त्यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय एकता दिन' म्हणून घोषित केला आहे. सरदार वल्लभभाई पटेल शेतकऱ्यांच्या हितासाठी अखेरपर्यंत लढले. त्याचबरोबर मिठाचा सत्याग्रह आणि असहकार चळवळीत त्यांनी गांधीजींना मोलाचे सहकार्य केले. फाळणी नंतर देशात अस्थिरता निर्माण झाली होती त्या काळात सरदार वल्लभभाई पटेल यांनी विखुरलेल्या देशाचे एकत्रिकरण करण्याचा प्रयत्न केला म्हणून खऱ्या अर्थाने ते 'लोहपुरूष' ठरतात. यावेळी डॉ. कणसे यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाचे महत्त्व सांगितले.
          
या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 'एकता रॅलीचे' आयोजन करण्यात आले होते.
      
यावेळी महाविद्यालयाचे कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख डॉ. विकास आवळे, डॉ.रूपाली कांबळे,प्रा. सतिश कांबळे, डॉ. वर्षा कुंभार, डॉ. वंदना सातपुते,डॉ. महेश कोल्हाळ, डॉ. कृष्णा भवारी प्रा. ए. ए. कुंभार, प्रा. नरेश पवार, प्रा. वाय. सी. धुलगंड इ. उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या मार्फत करण्यात आले होते. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth"s Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)