Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात संविधान दिन साजरा

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात संविधान दिन साजरा


सांगली: भारती विद्यापीठाच्या डाॅ. पतंगराव कदम महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. डी. जी. कणसे यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले. आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कणसे म्हणाले की, 'भारतीय स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधान अमलात आल्यामुळे आज संपूर्ण भारतात सर्व जातीधर्माचे लोक आनंदाने एकत्र राहत आहेत. त्यांच्यामध्ये स्वतंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांची जडणघडण झाली आहे. इतर अविकसित व विकसनशील देशांची तुलना करता सर्वच पातळ्यांवर भारत देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. हे सर्व संविधानामुळे शक्य झाले. भारतीय संविधनाने दिलेले लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचले पाहिजेत, त्यासाठी यापुढेही प्रत्येकाने भारतीय राज्यघटनेची मूल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे.'        
      
या कार्यक्रमाला कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत, ज्युनिअर विभाग प्रमुख प्रा. ए. एल. जाधव, अंतर्गत गुणवत्ता हमी विभाग प्रमुख डाॅ. ए. आर. सुपले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डाॅ. व्ही. बी. आवळे, प्रा. एस. डी. पाकले उपस्थित होते. त्याचबरोबर महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. व्ही. एस. सातपुते यांनी केले तर आभार प्रा. सतीश कांबळे यांनी मानले.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)