डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात प्राध्यापक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन
डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात प्राध्यापक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन
सांगली: भारती विद्यापीठाचे डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी विभागाच्या वतीने दोन दिवसाच्या प्राध्यापक प्रशिक्षण कार्यशाळेचे दि. ११ व १२ डिसेंबर २०२२ रोजी आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी नवीन शैक्षणिक धोरणा संबधी सविस्तर आढावा घेतला. दुसऱ्या सत्रात वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. एस. एन. बोऱ्हाडे यांनी प्राध्यापकांना वार्षिक स्वंयम मूल्यांकन अहवाल पूर्तता या विषयी मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी अंतर्गत गुणवत्ता हमी विभागाचे प्रमुख डॉ. ए. आर. सुपले यांनी नॅकला सामोरे जाण्यासाठी एस. एस. आर. ची तयारी व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता याविषयी मार्गदर्शन केले. स्वागत व प्रास्ताविक कला व वाणिज्य विभागप्रमुख प्रा. टी.आर. सावंत यांनी केले तर प्रा.भारती भावीकट्टी यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. शिल्पा साळुंखे यांनी केले. या कार्यशाळेला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment