इधोस - डॉ. कृष्णा भवारी
इधोस
लेखक : डॉ. कृष्णा भवारी
आदिवासी जीवनावरील वास्तवदर्शी
कादंबरी.आदिवासी अत्यंत कष्टाळू, प्रामाणिक, आपल्याच संस्कृतिशी घट्ट
नाळ पकडून आहे. आजही दुर्गम भाग, पावसाचे प्रमाण अधिक असल्याने शहरी व ग्रामीण भागाशी संपर्क
कमी. अजूनही अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या गर्तेत आहे. असं असूनही आदिवासी त्यांची
स्वतःची अशी जीवनशैली आहे. लेखक स्वतःच आदिवासी पाड्यातील
असल्यामुळे बोलोभाषेतच शिकार, मासेमारी, बाजार, लग्न समारंभाचे वर्णन केले
आहे. लग्न समारंभातील आदिवासीतील रीतीरीवाज, देण्या- घेण्याच्या पद्धती, मान-पान, अनेक प्रसंगी गाणी, नाव घेणं हे सर्व वाचताना
ती दृश्य डोळ्यासमोर उभी राहतात. आदिवासी संस्कृतीची ओळख होते. तर पराकोटीचे दारिद्र्य, प्रगतीच्या नावाखाली त्यांच्याच
वाडया वस्तीतून त्यांना परकं करणं हे वाचून मन विषन्न होते. एकेकाळी जंगलचा राजा
असणारा हा आदिवासी आज मात्र त्यांच्याच भागात पोरका होताना दिसतो आहे.
हृदयस्पर्शी आणि वाचनीय
अशी कादंबरी लेखकांनी आपल्यापुढे ठेवली आहे.
पुस्तक परिचय: प्रा. कु. सुलभा तांबडे
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment