डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा भारती विद्यापीठाशी सामंजस्य करार
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा भारती विद्यापीठाशी सामंजस्य करार
कोल्हापूर: भारती विद्यापीठाचे डॉ पतंगराव कदम महाविद्यालय आणि डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे यांच्यात नुकताच सामंजस्य करार संपन्न झाला. या करारामुळे दोन्ही संस्थांना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर संशोधन करण्यासाठी नवे व्यासपीठ मिळाले आहे. या करारामध्ये विद्यार्थी- प्राध्यापक विनिमय कार्यक्रम,जोड प्रकल्प, प्रगत संशोधन अशा बहूआयामी बाबी राबविण्यात येणार आहेत.
भारती विद्यापीठाचे डॉ पतंगराव कदम महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय संशोधन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या उदघाटन कार्यक्रमात हा सामंजस्य करार संपन्न झाला. यावेळी डी.वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के.प्रथापन, डॉ. होमी भाभा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ आर के कामत, प्राचार्य डॉ.डी.जी.कणसे, उपप्राचार्य डॉ एस एन बोऱ्हाडे, उपप्राचार्य व आयक्यूएसी समन्वयक डॉ.ए.आर.सुपले, अवकाश वैज्ञानिक व परिषदेचे समन्वयक डॉ.दादा नाडे, डॉ. संदीप वाटेगावकर, डॉ राणी पवार, डॉ.के.डी.सोनवणे, प्राचार्य डॉ.एच.एम. कदम डॉ.संभाजी पवार व आदी मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment