सुक्ष्मजीवशास्त्र विभागास माजी विद्यार्थ्याची सदिच्छा भेट व आजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
भारती विद्यापीठाच्या डॅा. पतंगराव कदम महाविद्यालयातील सुक्ष्मजीवशास्त्र विभागास दि. २७/०२/२०२३ रोजी, विशाल माळी या माजी विद्यार्थ्याने सदिच्छा भेट दिली व महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना 'सुक्ष्मजीवशास्त्राचा अभ्यास करताना....' या विषयावर मार्गदर्शन केले. सदर मार्गदर्शनात ते म्हणाले, सुक्ष्मजीवशास्त्र विषय खूपच विशाल आणि विस्तीर्ण असा आहे. या विषयात आपल्याला देशात व विदेशात संशोधनात व नोकरीत विपुल संधी उपलब्ध आहेत. तसेच यासाठी विविध सरकारी व खाजगी शिष्यव्रृत्ती मिळू शकतात. ते पुढे म्हणाले, या सर्व संधी मिळवायच्या असतील तर, सुक्ष्मजीवशास्त्र विषयातील संदर्भ पुस्तकांचे वाचन असणे महत्त्वाचे आहे.याबरोबरच त्यांनी स्वतःच्या चालू असलेल्या प्रकल्पाची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.यानंतर सुक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. कु. भारती भावीकट्टी यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर संशोधनाकडे/ प्रकल्पाकडे लक्ष दिले पाहिजे. आतापासूनच संशोधन करायची सवय लागल्यास भविष्यात त्याचा उपयोग फार चांगला होतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अरीफ मुलाणी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सपना वेल्हाळ यांनी केले. सदर कार्यक्रमाकरिता सुक्ष्मजीवशास्त्र विभागातील प्रा. संजीवनी भेडसे, प्रा. सुकन्या कांबळे उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment