डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाला एनसीसी युनिट मंजूर : प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाला एनसीसी युनिट मंजूर : प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे
सांगली: येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाला चालू शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) अनुदानित स्वरूपातील युनिट मंजूर केले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी दिली.
एनसीसी मुख्यालय आणि एनसीसी संचालनालय, मुंबई यांच्या मान्यतेनुसार महाविद्यालयाला एनसीसी युनिट मंजूर झाल्याबद्दल १६ महाराष्ट्र बटालियन एनसीसी कर्नल व कमांडिंग ऑफिसर मनीष नातू यांचे पत्र नुकतेच प्राप्त झाले असल्याचेही डॉ. कणसे यांनी सांगितले. एनसीसीसाठी प्रवेश क्षमता १०० इतकी असून चालू शैक्षणिक वर्षात जून २०२३ पासून महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एनसीसीसाठी प्रवेश घेता येईल असे प्राचार्य डॉ. कणसे म्हणाले.
महाविद्यालयाला एनसीसीचे युनिट मंजूर झाल्याबद्दल भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम, कुलपती प्रा. (डॉ.) शिवाजीराव कदम, सहकार्यवाह डॉ. के. डी. जाधव व डॉ. एम. एस. सगरे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, उपप्राचार्य प्रा. (डॉ.) शिवाजी बो-हाडे, डॉ. अमित सुपले, कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक या सर्वांचे अभिनंदन केले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment