डाॅ. पतंगराव कदम महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
डाॅ. पतंगराव कदम महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
सांगली : भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.जी.कणसे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थितांना संदेश देताना ते म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यांचे सर्वप्रथम स्मरण केले पाहिजे. आपल्या देशाने ७६ वर्षांत विविध क्षेत्रांत प्रगती केली आहे. तरीही भ्रष्टाचार, दारिद्र्य, वाढती लोकसंख्या, बेरोजगारी या समस्यांचे अजूनही आपल्यासमोर आव्हान आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी यापुढे आपल्याला जबाबदारीने वागावे लागणार आहे. त्यासाठी सर्वांनी देशाची एकता, बंधुता व समता यांचे पालन केले पाहिजे. यामुळेच भारत देश प्रगतीपथावर जाईल.
यावेळी एन.सी. सी. मधील विद्यार्थ्यांनी मानवंदना संचलनाचे प्रात्यक्षिक सादर केले. तसेच स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भारती विद्यापीठाचे विभागीय मानद संचालक डॉ. एच. एम. कदम यांच्या शुभहस्ते महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन एन.एस.एस. विभागातर्फे करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. आर. सुपले, वरिष्ठ प्राध्यापक टी. आर. सावंत, कनिष्ठ विभागाचे प्रमुख प्रा. अरूण जाधव यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment