Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या तेरा विद्यार्थांची मल्होत्रा वेकफील्ड फाउंडेशन शिष्यवृत्ती साठी निवड

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या तेरा विद्यार्थांची मल्होत्रा वेकफील्ड फाउंडेशन शिष्यवृत्ती साठी निवड



सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील तेरा विद्यार्थ्याना वेकफील्ड फाउंडेशन, पुणे यांचेकडून 'मल्होत्रा वेकफील्ड फाउंडेशन शिष्यवृत्ती' प्राप्त झाली. फाउंडेशनकडून शास्त्र शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांना दरवर्षी पदवी, पदव्युत्तर पीएच. डी. शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्तीचे स्वरूप प्रत्येक वर्षी 12000 रू. (पदवी अभ्यासक्रम) व 20000 रू. (पदव्युत्तर अभ्यासक्रम ) असे आहे.


यावर्षी कदम महाविद्यालयातील एकूण तेरा विद्यार्थ्याना ही शिष्यवृत्ती मिळाली असून त्यामध्ये बी.एस्सी. भाग- मधुन कु. सुप्रिया अंबी, कु. प्रेरणा पाटील, कु. रिद्धी पाटील, कु. सानिया मुल्ला, कुमार रोहित पाटील, बी.एस्सी. भाग- मधुन कु. श्रावणी मलपे, कु. वैष्णवी पुराणिक, कु. अनुराधा जाधव, तसेच बी.एस्सी. भाग- मधुन वैष्णवी जाधव, कु.सानिका पवार, कु.प्रतीक्षा जाधव, कु.प्रियांका देशमुख आणि एम.एस्सी. भाग मधील कु. शुभांगी पाटील यांचा समावेश आहे.


सर्व यशस्वी विद्यार्थ्याना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांचे प्रोत्साहन केमिस्ट्रीचे प्राध्यापक डॉ. टी. आर. लोहार यांचे मार्गदर्शन मिळाले. यावेळी निवड झालेल्या विद्याथ्याचे कौतुक करताना डॉ. कणसे म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीत सातत्यपूर्ण अभ्यास करत उत्तम गुण मिळवलेल्या विद्यार्थ्याना त्यांची शैक्षणिक प्रगती करण्यासाठी अशा स्वरूपाच्या स्कॉलरशिप दिल्या जातात. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करून आपली शैक्षणिक प्रगती करावी असे आवाहन त्यांनी केले.


यश प्राप्त केल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, उपप्राचार्य प्रोफेसर डॉ. एस. एन. बोऱ्हाडे, डॉ. . आर. , ज्येष्ठ प्राध्यापक टी. आर. सावंत यांच्यासहित सर्व प्राध्यापकांनी  यशस्वी विद्यार्थ्यांचे  हार्दिक अभिनंदन केले


(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)