स्नेहल हजारेचा दिल्ली येथील विशेष शिबिरात सहभाग
स्नेहल हजारेचा दिल्ली येथील विशेष शिबिरात सहभाग
सांगली : येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका व प्रथम वर्ष विज्ञानची विद्यार्थिनी कु. स्नेहल संजय हजारे हिने दिल्ली येथे झालेल्या विशेष शिबिरात शिवाजी विद्यापीठाच्या संघातून सहभाग नोंदविला. या शिबिरातील 'मेरी माटी मेरा देश' या कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या अमृत वाटिका कार्यक्रमामध्ये ती सहभागी झाली होती. दिल्ली येथे 29 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत हे शिबिर संपन्न झाले. या शिबिरासाठी शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व महाविद्यालयांमधून निवडक स्वयंसेवकांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये कु. स्नेहल हजारे या एकमेव विद्यार्थिनीचा समावेश झालेला होता.
तिची निवड व सहभागाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, उपप्राचार्य प्रा. डॉ. शिवाजी बोऱ्हाडे व डॉ. अमित सुपले, कला व वाणिज्य प्रमुख प्रा. टी. आर. सावंत सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांनी तिचे अभिनंदन केले. यासाठी तिला राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास आवळे व डॉ. रूपाली कांबळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment