डॅा. पतंगराव कदम महाविद्यालयातील सुक्ष्मजीवशास्त्र विभागात पोस्टर्स स्पर्धा उत्साहात संपन्न
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील सुक्ष्मजीवशास्त्र विभागात पोस्टर्स स्पर्धा उत्साहात संपन्न
सांगली दि. १२/०१/२२४,येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात, भारती विद्यापीठाचे संस्थापक, डॉ.पतंगराव कदम यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमीत्त सुक्ष्मजीवशास्त्र विभाग व मायक्रोबायोलॅाजी सोसायटी, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच युवा दिनाचे औचित्य साधून, स्वामी विवेकानंदांचे प्रतिमा पूजन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. स्पर्धेचा विषय सुक्ष्मजीवशास्त्राशी संबंधीत पोस्टर्स असा होता. स्पर्धेकरिता विद्यार्थ्यांचा भरघोस व उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. पोस्टर तयार करताना विद्यार्थ्यांनी कल्पकतेने ती पोस्टर्स वैज्ञानिक ज्ञान रंजक पद्धतीने सादर करून प्रेक्षकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.यामध्ये पदवी व पदव्युत्तर सुक्ष्मजीवशास्त्र विषय असणार्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या स्पर्धेत एकुण ७३ पोस्टर्सची नोंदणी झाली. सदर स्पर्धेमध्ये सुक्ष्मजीवशास्त्राचा इतिहास, व्याप्ती, सुक्ष्मजीवशास्त्राचे उपयोजन, दैनंदिन जीवनातील सुक्ष्मजीवांचे महत्व, मानवी शरीरातील सुक्ष्मजीवांचा अधिवास व त्यांचे महत्व, विविध लसी, रोगजंतू व विषाणुंपासुन होणारे विविध आजार, प्रतिबंध, प्रतिजैविके व सुक्ष्मजीवांचा प्रतिरोध, विविध चाचण्या व उपकरणे अशा अनेक विषयांसंदर्भातील पोस्टर्स बनवण्यात आले होते. त्याद्वारे सध्याच्या काळातील सुक्ष्मजीवशास्त्राचे महत्व विद्यार्थ्यांनी सर्वांना पटवून दिले. सदर कार्यक्रमाकरिता सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेचे नगरसेवक श्री. अजिंक्य पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे होते. याचबरोबर उपप्राचार्य डॅा. ए. आर. सुपले उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. अजिंक्य पाटील यांच्या हस्ते व प्राचार्य डॅा. डी. जी. कणसे, डॅा. ए. आर. सुपले, सुक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. सौ. बी. के. भावीकट्टी यांच्या उपस्थितीत फीत कापून करण्यात आले. प्रारंभी विभाग प्रमुख प्रा. सौ. बी. के. भावीकट्टी यांनी प्रमुख पाहुणे नगरसेवक अजिंक्य पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर पाहुण्यांनी सर्व पोस्टर्स पाहिले आणि विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले. प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी सूक्ष्मजीवशास्त्राचे ज्ञान सर्व विद्यार्थ्यांना असणे कसे महत्त्वाचे आहे याविषयी मार्गदर्शन केले व उदंड सहभागाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
सदर स्पर्धा व्यवस्थित पार पडण्याकरिता डॅा. एम्. जे. धनवडे, सौ. एस्. ए. भेडसे, कु. एस्. ए. कांबळे, श्री. एम्. एस्. पटेल, श्री. ए. ए. मुलाणी यांनी परिश्रम घेतले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment