डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी
सांगली : भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात थोर स्वातंत्र्यसेनानी आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती, प्रतिमेचे पूजन करून साजरी करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे म्हणाले की, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाचे योगदान होते. ते शिस्तप्रिय, निर्भीड वक्ता आणि मुत्सद्दी होते. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर पडला होता. ते राष्ट्रवादाशी एकनिष्ठ होते. स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचा सक्रिय सहभाग आणि निस्सीम देशभक्ती या गुणांमुळे ते जनसामान्यांत लोकप्रिय होते. अशा या थोर स्वातंत्र्यसेनानीच्या कार्याची प्रेरणा घेऊन त्यांचे स्मरण करणे गरजेचे आहे.
यावेळी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. नितीन गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागाच्या वतीने केले होते. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment