डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास हा या दोन वर्षांमध्ये खऱ्या अर्थाने होत असतो. उच्च शिक्षणाकडे भरारी घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पंखामध्ये बळ निर्माण होते ते दोन वर्षांमध्ये होत असतं. बारावीच्या गुणावतीच विद्यार्थ्याचं करिअर अवलंबून असते.असे प्रतिपादन समारंभाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे यांनी केले.
स्वागत व प्रस्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. आर. एस. काटकर यांनी केले. एच एस सी बोर्ड परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी त्यांनी मनोगत व्यक्त केले. व्ही. एन. डुबल यांनी विद्यार्थ्यांनी परीक्षा काळात घ्यावयाची पथ्य या विषयी मनोगत व्यक्त केले केले. तसेच विभाग प्रमुख ए.एल.जाधव यांनी एच एस सी बोर्ड परीक्षा प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. भारती विद्यापीठ, डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय हे संस्काराचे केंद्र आहे. आमच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास केवळ भारती विद्यापीठामुळे झाला असे मत कु. पूर्वा कारेकर हिने व्यक्त केले. तसेच अकरावी कला शाखेची विद्यार्थिनी कु. रितू केवट हिने भारती विद्यापीठ व शिक्षक वृंद यांच्या विषयी ऋण व्यक्त केले.
शुभेच्छा समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. वसंती गावडे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा एच. टी मुल्ला यांनी मानले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment