डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात महिलांचा सत्कार संपन्न
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात महिलांचा सत्कार संपन्न
सांगली: दिनांक,8 मार्च 2024
जागतिक महिला दिनानिमित्त आज येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात महिला शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. प्रा.डॉ. प्रभा पाटील प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी याप्रसंगी सर्व महिलांना मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात त्या म्हणाल्या महिलांनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगून सर्व अडचणींवर मात करून स्वतःचा आणि कुटुंबाचा विकास साधला तर देशाच्या विकासाला हातभार लागेल. उदाहरणादाखल त्यांनी लुईस एल इ लिखित 'यू कॅन हील युवर लाईफ' या पुस्तकाच्या लेखिकेने सकारात्मक दृष्टिकोन बाळगून कॅन्सर सारख्या दूर्धर आजारावर कशी मात केली आणि जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे कसा वळवला ते स्पष्ट केले. लेखिकेने वापरलेल्या प्रणालीचा प्रत्येक महिलेला उपयोग करून घेता येईल आणि सकारात्मक दृष्टिकोन तयार करता येईल असे सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.जी कणसे यांनी सर्व उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच आजच्या युगात महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत, शिक्षण क्षेत्रात तर मुली मुलांपेक्षाही आघाडीवर आहेत त्यामुळे महिलावर्गाचे भवितव्य निश्चितच चांगले असणार आहे असे प्रतिपादन केले. ते पुढे म्हणाले श्रीमती इंदिरा गांधी, सौ. प्रतिभाताई पाटील या महिला म्हणून कुठेही कमी नव्हत्या, महत्त्वाचे राजकीय निर्णय घेण्याची धडाडी त्यांच्यात होती व आता द्रौपदी मुर्मू यांच्यात तशीच प्रतिभा आहे.
याप्रसंगी डॉ. सौ.प्रभा पाटील व प्राचार्य यांच्या हस्ते उपस्थित महिलांचा सत्कार करण्यात आला.
लेडीज असोसिएशनच्या प्रमुख प्राध्यापिका कु.भारती भावीकट्टी यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले तसेच सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. कु. रोहिणी वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. डॉ. रूपाली कांबळे यांनी आभार मानले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment