प्र. प्राचार्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. एस. व्ही. पोरे यांचा सत्कार
प्र. प्राचार्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. एस. व्ही. पोरे यांचा सत्कार
सांगली - डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली येथे रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. एस.व्ही. पोरे यांची प्रभारी प्राचार्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल महाविद्यालयातील कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. ए.एल. जाधव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे डॉ. पोरे म्हणाले की, भारती विद्यापीठाच्या परिक्षेत्रात डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या नावाने असलेले हे एकमेव महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेऊन महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवण्याचा सदैव प्रयत्न केला जाईल असा विश्वास त्यांनी दिला. या कार्यक्रमाप्रसंगी कनिष्ठ विभागातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
या समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा.ए.एल. जाधव यांनी केले. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. आर. एस. काटकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. डी.व्ही. सूर्यवंशी यांनी केले.
(Bharari Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment