डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचे सेट व स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचे सेट व स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश
सांगली: महाराष्ट्र लोकसेवा आयोग कडून घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगली येथील माजी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये सांख्यिकीशास्त्र विभागातील कु. पूजा चंद्रकांत भोसले हिची असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणून तर भौतिकशास्त्र विभागातील कु. सौरभ शिवलिंग खबीले याची मुंबई पोलिस पदी निवड झाली आहे.
याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठद्वारे घेण्यात आलेल्या सेट या परीक्षेमध्ये सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील कु. सपना वेल्हाळ, कु. प्रिया पवार, सांख्यिकीशास्त्र विभागातील कु. ज्योती कोळी, कु. स्मिताली चौगुले, कु. पुजा शिरढोणे, वाणिज्य विभागातील कु. प्रियांका धुले, भौतिकशास्त्र विभागातील कु. मृणाली पाटील व रसायनशास्त्र विभागातील कु. प्रमोद जगताप या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
वरील सर्व माजी विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवून भारती विद्यापीठ आणि डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल भारती विद्यापीठाचे कार्यवाह, माजी राज्यमंत्री व आमदार मा. डॉ. विश्वजीत कदम, महाविद्यालय विकास समिती व भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा मा. विजयमाला कदम तथा वहिनीसाहेब, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय पुणेचे कुलपती मा. डॉ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठ मेडिकल फाउंडेशनच्या कार्यकारी संचालिका मा. डॉ. अस्मिताताई जगताप, सहकार्यवाह मा. डॉ. के. डी. जाधव, मा. डॉ. एम. एस. सगरे, सांगली विभागीय संचालक मा. डॉ. एच. एम. कदम, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. संजय पोरे, उपप्राचार्य डॉ. अमित सुपले व प्राध्यापक यांनी शाबासकी देऊन त्यांचे कौतुक केले.
(Bharari Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment