डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात "हर घर तिरंगा" उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन
सांगली : येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात देशाचा ७८ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थितांना संदेश देताना ते म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांचे सर्वप्रथम स्मरण केले पाहिजे. देशाने ७८ वर्षांत विविध क्षेत्रांत प्रगती केली आहे परंतु आपल्यासमोर काही आव्हानेही आहेत, त्याला सामोरे जाण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागले पाहिजे. राज्यघटनेतील न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्त्वांचे नीट पालन केले तर आपल्या देशाचा खऱ्या अर्थाने विकास होईल. "हर घर तिरंगा" या उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या घरी झेंडा लावावा असे आव्हानही त्यांनी केले.
याप्रसंगी सांस्कृतिक विभागातर्फे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले तर राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. आर. सुपले, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. नितिन गायकवाड, कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास आवळे, डॉ. रुपाली कांबळे, कनिष्ठ विभागाचे प्रमुख प्रा.अरूण जाधव, प्रा.संजय ठिगळे, माजी प्रा. प्रदिप डिकुळे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharari Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment