Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र पदव्युत्तर विभागाचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र पदव्युत्तर विभागाचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न


सांगली :  येथील भारती विद्यापीठाचे डॅा. पतंगराव कदम महाविद्यालयातील  एम.एस्सी.भाग-२ सूक्ष्मजीवशास्त्र  विभागातील विद्यार्थ्यांनी एम.एस्सी.भाग १ च्या विद्यार्थ्यांकरिता स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ.एस.व्ही. पोरे होते. 
       

यावेळी  विद्यार्थ्यांनी प्रमुख मान्यवरांचे व नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांचे भारतीय पद्धतीने औक्षण केले.  या प्रसंगी विद्यार्थ्यांनी 'आजची स्त्री: सुरक्षित की असुरक्षित' या  ज्वलंत विषयावर हृदयस्पर्शी पथनाट्य सादर केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांकरिता विविध फनी गेम्स व  शेलापागोटे याचे आयोजन केले होते तसेच विद्यार्थ्यांनी समूहनृत्य सादर केले.
      
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्र. प्राचार्य डॅा. पोरे  म्हणाले की, भारती विद्यापीठातल्या विविध विद्याशाखा, सुसज्ज इमारती, तज्ञ शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थ्यांना इथे उपलब्ध असणाऱ्या सोयी सवलती विषयी माहिती  सांगून सद्या बदलत्या परिस्थितीत विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षणाबरोबरच समाजोपयोगी संशोधन करावे. तसेच  विद्यार्थ्यांनी आपली वर्तणूक आदर्शवत अशी असली पाहिजे की, त्यावर सर्व विद्यार्थ्यांनी पावलावर पाऊल टाकले  पाहिजे. आपण कोणतेही पुस्तक वाचले तर त्या पुस्तका विषयी चार ओळी तरी लिहून काढाव्यात. युट्यूब, व्हिडिओ, जनसंपर्कमाध्यम सारख्या उपलब्ध साधनांचा विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी वापर केला पाहिजे, पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी  समाजोपयोगी उपक्रमातही सहभागी होऊन समाजामध्ये बदल घडवून आणला पाहिजे.  यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याचे विशेष कौतुक करून या शास्त्राचे पहिले विभागप्रमुख डॉ. एम. जी. बोधनकर यांचा 'गुरुवर्य' असे सन्मानाने उल्लेख केला तसेच व  पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून एक आदर्श निर्माण करावा.
     
यावेळी प्रा. मतीन पटेल यांनी आई-वडिलांची माहिती सांगणारे सुंदर गाणे सादर केले. श्री. श्रेयस शेटे या विद्यार्थ्याने आई-वडिलांचे महत्त्व सांगितले 
कु. आफरीन मुलानी हीची मिस फ्रेशर म्हणून तर श्री. श्रेयश शेटे यांची मिस्टर फ्रेशर म्हणून निवड करून त्यांना गौरवण्यात आले.

सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. कु .भारती भावीकट्टी यांनी  महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या इतिहासाचा उलगडा करून विभागाची सुरुवात,  संस्थेचे विशेष योगदान, विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या शिष्यवृत्त्या, संशोधन, अभ्यासपूरक कार्यक्रम व विविध स्पर्धांमधील यश इत्यादी गोष्टींची माहिती दिली 
       
यावेळी उपप्राचार्य डॉ. अमित सुपले तसेच डॉ. एम्. जे. धनवडे, श्री. ए. ए. मुलाणी, श्री. एम. एस. पटेल, कु. एस. एस. पाटील, कु. व्ही. एस. पाटील इ. उपस्थित होते.
   
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. कु. भारती भावीकट्टी यांनी केले. कार्यक्रमाचे आभार आर. आर. केवट यांनी केले तर  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस. एस. सनदी व कु. ए. एम. मुजावर यांनी केले. या कार्यक्रमास  सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)