डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे जलतरण स्पर्धेत यश
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे जलतरण स्पर्धेत यश
भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगली येथील इयत्ता११ वी विज्ञान शाखेचे विद्यार्थी कु.वरद निकम (५०मी. बॅक स्ट्रोक फ्री स्टाईल), कु.विजय पुजारी (१०० मी.फ्री स्टाईल),व कु.पार्थ कोळी (५० मी.फ्री स्टाईल) या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवले. अशाप्रकारे जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी यश मिळवून भारती विद्यापीठ आणि डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे नाव उज्वल केले.
या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. व या मिळालेल्या यशाबद्दल कौतुक करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपले सुप्त गुण ओळखून त्या गुणांचा विकास करावा. व अभ्यासाबरोबर खेळाकडे लक्ष देऊन स्वतःला सिद्ध करावे. असे सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कनिष्ठ विभागप्रमुख प्रा. ए. एल. जाधव यांनीही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल मनोगत व्यक्त करून त्यांना शुभेच्छा दिल्या.तसेच क्रीडा प्रशिक्षक प्रा. विनायक पवार, प्रा.ओंकार चव्हाण यांचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभले.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रा.वासंती गावडे, प्रा.पाकले एस.डी., प्रा. चौगुले एस.बी, प्रा. एच. टी. मुल्ला, प्रा. एस. व्ही. जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.आर.एस.काटकर यांनी केले. व तर आभार प्रा. एस. बी. पाटील यांनी केले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment