डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील प्रा. चंद्रकांत शेटे गुरुभूषण पुरस्काराने सन्मानित
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील प्रा. चंद्रकांत शेटे 'गुरुभूषण' पुरस्काराने सन्मानित
सांगली : भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील संख्याशास्त्राचे प्राध्यापक चंद्रकांत शेटे यांना स्वप्नपूर्ती फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा 'गुरुभूषण' या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रा. शेटे यांनी महाविद्यालयात एकूण ३६ वर्षे अत्यंत प्रामाणिक आणि निष्ठेने सेवा केली. त्यांचे अनेक विद्यार्थी देशविदेशात उच्च पदावर कार्यरत आहेत. संख्याशास्त्र हा विषय तसा विद्यार्थ्यांना कठीण वाटणारा, पण विद्यार्थ्यांना अगदी सोप्या पद्धतीने शिकविण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. या वर्षी त्यांच्या विभागाची एक विद्यार्थिनीने शिवाजी विद्यापीठाच्या बी. एस्सी परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविले तर तीन विद्यार्थिनी सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना हा अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सदरचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठाचे कार्यवाह व माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा मा. विजयमाला कदम, भारती विद्यापीठ मेडिकल फाउंडेशनच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिताताई जगताप, सहकार्यवाह डॉ. के. डी. जाधव, डॉ. एम. एस. सगरे, सांगली विभागीय संचालक डॉ. एच. एम. कदम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पोरे, महाविद्यालयातील प्राध्यापक व आजी-माजी विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment